Sunny Leaone : मी माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय स्वतः घेतले, माझ्या मुलांनी देखील स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत

Sunny Leaone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी एक पॉर्नस्टार होती हे सर्वांनाच माहीत आहे. अर्थात सनीला तिच्या भूतकाळाबद्दल कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. पण तिचा भूतकाळ अद्याप तिची पाठ सोडायला तयार नाहीय. सोशल मीडियावर अनेकदा लोक तिच्या भूतकाळाचा दाखला देत तिच्यावर टीका करत असतात. सनीला या सर्व गोष्टींचा फारसा फरक पडत नसला तरी ३ मुलांची आई म्हणून आता मात्र तिला भूतकाळाबद्दल भीती वाटत आहे. याचा खुलासा अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये सनीनं केला.
मुलाखतीत बोलताना सनीनं आपल्या मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ती म्हणाली, असं होऊ शकतं की जेव्हा माझी मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना माझ्या काही गोष्टी आवडणार नाहीत आणि ते काय आहे हे सर्वांना माहीत आहे. कदाचित बोलून काही गोष्टी सुधारता येतील आणि त्यांच्या कुटुंबावर केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील. त्यांनी हे समजून घ्यायला हवे की, प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जोपर्यंत त्यामुळे कोणालाही नुकसान होतं नाही तोपर्यंत ठीक आहे.
मी माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय स्वतः घेतले आणि माझ्या मुलांनी देखील स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत असे मला वाटते. एक पालक म्हणून मला असे वाटते की तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन करू शकता. त्याच्या सोबत राहून त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना पाठिंबा देऊ शकता. मग त्यांचा निर्णय काही असो.
कॅनडामध्ये जन्मलेली सनी लिओनी ही मूळची भारतीय आहे. तिने २०११ साली डॅनिअल वेबरशी लग्न केले होते. २०१७ साली तिने महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका अनाथालयातून मुलगी निशाला दत्तक घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये सनी आणि डॅनिअलनं सरोगसीद्वारे अशर आणि नोआ या दोन मुलांना जन्म दिला. एकेकाळी पॉर्न स्टार असलेली सनी आज बॉलिवूड अभिनेत्री आणि ३ मुलांची आई आहे.