सुनील छेत्री लवकरच होणार बाबा

0
WhatsApp Group

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री लवकरच बाबा होणार आहे. सामन्यादरम्यान एका अनोख्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून छेत्रीने ही माहिती दिली. छेत्रीच्या गोलच्या जोरावर भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात वानुआतूचा 1-0 ने पराभूत केले आणि अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले पण जागतिक क्रमवारीत 164 व्या क्रमांकावर असलेल्या वानुआटूच्या बचावामुळे त्यांना बराच वेळ आघाडी घेण्यापासून रोखले. स्टार स्ट्रायकर छेत्रीने सामन्याच्या 81व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय निश्चित केला.

सुनील छेत्रीने गोल केल्यानंतर चेंडू जर्सीच्या आत लपवला. यानंतर त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित पत्नी सोनम भट्टाचार्यकडे पाहून अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. छेत्रीने सोनमला फ्लाइंग किस दिला आणि पत्नीनेही उठून पतीला प्रोत्साहन दिले. सोनम बेबी बंपसोबत दिसली. या सेलिब्रेशनच्या माध्यमातून छेत्रीला त्याच्या चाहत्यांना सांगायचे होते की तो लवकरच पिता होणार आहे.