सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, मुकेश अग्निहोत्री यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

WhatsApp Group

काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका वड्रा गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करू.