
महाराष्ट्र नव निर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या सभेवरुन आता भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. विखे पाटील यांनी आज बीड येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आज परळीमधील गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी सुजय विखे पाटील यांनी संवाद साधला.
महाराष्ट्रातली शेतकऱ्यांचे दुर्दैव, शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न बाजूला ठेवून, राज्यातील राजकारण वेगळ्या स्पर्धेकडे निघाले आहे. आज या नेत्याची ह सभा, उद्या ती सभा, मग परत उत्तर सभा. मला वाटते शेतकऱ्यांचे वाटोले जरी झाले तरी त्यांच्याकडे पाहायला कोणाला वेळ नाही, असा नाव न घेता टोला विखे पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.
आज सगळीकडे राजकारण सुरू आहे, राजकारणापलीकडे जाऊन कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे आता हा सगळा तमाशा बंद करावा, सभांवर बंदी आली पाहिजे. असं म्हणत खासदार सुजय विखे पाटील यांनी, औरंगाबाद येथे झालेल्या मनसेच्या आणि शिवसेना सभेवरुन, दोन्ही ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. ते परळी येथील गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.