एकतर्फी प्रेम प्रकरणातुन एका 23 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असं या युवकाचं नाव आहे. सतीश पवार याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिने नकार दिल्यामुळे तो दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन रश्शीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवलं. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
स्टेट्स ठेवत संपवलं जीवन
आत्महत्या करण्यापूर्वी सतीशने जीवन संपवल्याचा स्टेट्स ठेवला असल्याचं त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत असुन या घटनेमुले संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
