सावंतवाडी : माजगाव येथे मित्राच्या रुमवर शिरशिंगे येथील तरुणाची आत्महत्या! कारण अस्पष्ट

साईल हा त्याच्या मित्राकडे माजगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता, सुट्टीचा दिवस असल्याने मित्र गावी गेला होता, साईल खोलीत एकटाच होता, या दरम्यान त्याने आपल्या एका मित्राला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती फोनवरून दिली

WhatsApp Group

सावंतवाडी : माजगाव येथे एका तरुणाने आपल्या मित्राच्या रुमवर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. हा युवक शिरशिंगे वीरवाडी या गावातील असून त्याचं नाव साईल सुनील राऊळ असं आहे. आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Gautami Patil: चर्चा तर होणारच! गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रदर्शित

साईल हा त्याच्या मित्राकडे माजगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता, आज सुट्टीचा दिवस असल्याने मित्र गावी गेला होता, साईल खोलीत एकटाच होता, या दरम्यान त्याने आपल्या एका मित्राला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती फोनवरून दिली, त्याचा मित्र त्या खोलीत पोहोचण्यापूर्वीच साईलने आपले जीवन संपवले. या प्रकरणी पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. ( A young man from Shirshinge committed suicide at a friend’s room in Sawantwadi Majgaon )