धक्कादायक! लग्न जुळत नसल्यामुळे तरुण शेतकऱ्याने स्वतःला पेटवून केली आत्महत्या

WhatsApp Group

बुलढाणा – कधी अवकाळी पाऊस तर कधी पूरस्थिती तर कधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना नेहमी करावा लागत असतो. त्यातच आता शेतकरी तरुणांना मुली देण्यासही नकार येत असल्याच्या भरपूर घटना आजपर्यंत समोर आल्या आहेत. तशीच काहीशी बुलढाण्यामध्ये Buldhana घटना घडली आहे.

तरुण शेतकरी असल्यामुळे मुलगी देण्यास कुणीही तयार नव्हते आणि आपले लग्न जुळत नसल्यामुळे बुलढाण्यातील या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आपले स्वत:चे सरण रचून या तरुणाने आत्महत्या केली आहे जिल्ह्यात Suicide of a young farmer in Buldhana District . ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर बुलढाणा एकच खळबळ उडाली आहे. बुलढाण्यामधील खामगाव पळशी खुर्दमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याचे महेंद्र नामदेव बेलसरे असे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? मृत शेतकरी महेंद्र नामदेव बेलसरे याच्या भावोजींनी पोलिसांना सांगितले की, महेंद्र बेलसरे हा माझा मेव्हणा आहे. तो शेती व्यवसाय करत होता. 16 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता तो मला भेटायला आला होता. मी पेट्रोल पंपावर कामालाअसतो. पेट्रोल पंपावर महेंद्र आला आणि मला म्हणाला की, मला कोणी मुलगी देत नाही. माझे लग्न करुन द्या. मी त्याला तुझ्यासाठी मुलगी पाहतो असे म्हटले. त्यानंतर महेंद्र निघून गेला.

त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो पुन्हा मला भेटायला आला. माझी पत्नी पुष्पा हिला तो भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर रात्री 8 वाजता त्याच्या गावातून किशोर बेलसरे यांचा फोन केला. त्याने सांगितले की, महेंद्र याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर मी लगेचचं घटनास्थळी जाऊन पाहिले असता महेंद्र बैलाच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला. तसेच त्याच्या मृत्यूबाबत आपल्याला कोणावरही संशय नाही असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.