मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, शिंदे सरकारकडून सर्व मागण्या मान्य

0
WhatsApp Group

Maratha reservation: मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सार्‍या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या परिवारांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी मान्य झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी शासन निर्णय झाला असून त्यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. यासाठी 1884 सालच्या मराठ्यांचा गॅझेटचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे.