Maratha reservation: मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सार्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
#WATCH | Navi Mumbai: Supporters of Maratha quota activist Manoj Jarange Patil celebrate, as he announces an end to the protests today after the government accepted their demands. He will break his fast today in the presence of Maharashtra CM Eknath Shinde. pic.twitter.com/w3e6ve8wLx
— ANI (@ANI) January 27, 2024
मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या परिवारांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी मान्य झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी शासन निर्णय झाला असून त्यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. यासाठी 1884 सालच्या मराठ्यांचा गॅझेटचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे.
Navi Mumbai, Maharashtra: Maratha Reservation activist Manoj Jarange Patil says, “Chief Minister Eknath Shinde has done a good job. Our protest is now over. Our request has been accepted. We will accept the letter from him. I will drink juice by the hands of the Chief Minister… pic.twitter.com/TAhS6ZANKj
— ANI (@ANI) January 26, 2024
#WATCH | Navi Mumbai: Maratha reservation activists celebrate after Manoj Jarange Patil announces to end the protests today as the government has accepted their demands pic.twitter.com/V1KxosEHRm
— ANI (@ANI) January 27, 2024