
काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात, तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला पुन्हा उभे राहण्याची (marathi suvichar) प्रेरणा देऊ शकेल.
1 | ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात! |
2 | अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.” |
3 | कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.” |
4 | माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,, |
5 | स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.” |
6 | क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.” |
7 | नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.” |
8 | आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं” |
9 | विझलो जरी आज मि अंत माझा नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. |
10 | श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. |
11 | शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही….. |
12 | सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र. |
13 | आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.” |
14 | मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.” |
15 | भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. |
काही सर्वोत्तम मराठी सुविचार (Best Marathi Suvichar Sangrah) हे यशस्वी आणि प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी भाग पडतात. जीवनाची खूप सारे पैलू हे या सुविचारांतून कळतात.
16 | संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.” |
17 | विपरीत परीस्थितीत काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात. |
18 | एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. |
19 | शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते. |
20 | आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. |
21 | मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ तर नक्कीच बदलते. |
22 | शहाणा माणूस नेहमी एकटा असतो आणि दुर्बल व्यक्ती नेहमीच घोळक्यात दिसून येते. |
23 | जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खा सोबत खेळायला शिका. |
24 | स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे, जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल. |
25 | तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. |
26 | लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. |
27 | आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे, जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे. |
28 | आयुष्य हे सर्कस मधल्या विदुषकाप्रमाणे बनले आहे, कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसवाच लागतं. |
29 | परिस्थितीच्या हातातली कठपुतळी होऊ नका, कारण आपणास परिस्थिती बदलण्याची शक्ती आहे. |
30 | यशापर्यंत पोहोचण्यासाठी, शॉर्टकट कधीच नसतो. |
यशाचा मुख्य आधार! सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा !! कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.
31 | एकवेळ जग जिंकता येईल, पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत, ते जो जिंकतो, तोच महावीर. |
32 | दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास, आपण कधीही वयाने वयस्कर नाही. |
33 | आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे, काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. |
34 | यशाची गुरुकिल्ली, सकारात्मक विचार. |
35 | कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो |
36 | आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. |
37 | भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणा शिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही. |
38 | हास्य ही निसर्गाची आणि देणगीची एक अनोखी भेट आहे, आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो. |
39 | नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो. |
40 | आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता. आणि नक्कीच तुमच्या सवयी, आपले भविष्य बदलेल. |
41 | आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. |
42 | आजच्या आनंदाच्या क्षणी, उद्याचे स्वप्न आणि समाधान कायम राहील, पण उद्याच्या चिंतांमध्ये आजचा आनंद गमावू नका. |
43 | जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा, चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा, चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे |
44 | दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू, शकत नाही,जोपर्यंत आपण, हरण्याचा विचार करत नाही. |
45 | आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा, शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं, कधीही चांगलं |
जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.
46 | आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण आपल्या वयापेक्षा ती तुमची प्रतिमा जास्त आहे. |
47 | संस्कारापेक्षा मोठा कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा नाही. |
48 | कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. |
49 | ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या, प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे. |
50 | हास्य हा एक उत्तम उपाय आहे.. संकटाना समोर जाण्यासाठी मनातील भीती दूर करण्यासाठी, आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी. |
51 | पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा. |
52 | मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणूसकीत आहे. |
53 | चारित्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित. |
54 | पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात. |
55 | नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात. |
56 | मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले, हुशार माणसाची ओरड ऐकावी. |
57 | मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. |
58 | स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय, आपली उपस्थिती लक्षात घेतली गेली नाही. |
59 | जेवढे चांगले तेवढे घ्या, वाईट टाकून द्या. |
60 | जीवन एक उत्सव आहे, प्रत्येक दिवस साजरा करा. |