स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सवर केले अनोखे ‘शतक’, जेम्स अँडरसन आणि मुथय्या मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील

WhatsApp Group

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक मोठा विक्रम केला आहे. दुस-या दिवशी ब्रॉडने क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पाहुण्या संघाचा यष्टीरक्षक काईल व्हर्नची विकेट घेत विकेटचे शतक पूर्ण केले. या मैदानावर 100 कसोटी बळी घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसनने केला होता. यासह एका मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ब्रॉड जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे.

ब्रॉड आणि अँडरसन यांच्याशिवाय श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेराथ यांनी एकाच मैदानावर 100 बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट्स घेणाऱ्या मुरलीधरनने एक नाही तर तीन मैदानांवर हा पराक्रम केला आहे. श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूने गाले, कॅंडी आणि कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड्सवर 100 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 553 विकेट्स आहेत. आता त्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचे असेल, ज्याने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 563 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर असून त्याच्या नावावर 658 विकेट्स आहेत.

एकाच मैदानावर 100 कसोटी बळी घेणारे खेळाडू

  • मुथय्या मुरलीधरन – सिंहला स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो – 166
  • मुथय्या मुरलीधरन – असगिरिया स्टेडियम, कॅंडी – 117
  • जेम्स अँडरसन – लॉर्ड्स, लंडन – 117*
  • मुथय्या मुरलीधरन – गॅले इंटरनॅशनल स्टेडियम, गले – 111
  • रंगना हेरथ – गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गले – 102
  • स्टुअर्ट ब्रॉड – लॉर्ड्स, लंडन – 100*