तैवानमध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप, पाहा थरकाप उडवणारे व्हिडीओ
तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने कहर केला याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Taiwan Earthquake Videos Viral: तैवानची राजधानी तैपेई येथे आज सकाळी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंप इतका जोरदार होता की शेजारील जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जपानच्या ओकिनावा विमानतळावरील उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. या भूकंपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणीही ठार झाल्याची किंवा जखमी झाल्याची कोणतीही बातमी अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. व्होल्कॅनो डिस्कवरीच्या अहवालानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 35 किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा धक्का जाणवला. भूकंपाची खोली जास्त असल्याने त्याचे केंद्रस्थानी जोरदार धक्के जाणवले.
सुनामीचा इशारा देण्यात आला आहे
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन शहराच्या दक्षिणेला सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननेही भूकंपानंतर सुनामीचा इशारा दिला आहे. CWA ने रहिवाशांना सुनामीचा इशारा पाठवला आहे. उत्तरेकडील किनारपट्टी भागात सुनामी येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. लोकांना ताबडतोब उंचावरील भागात जाण्यास सांगण्यात आले आहे. 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर आणखी अनेक धक्के जाणवले आहेत. यापैकी काही भूकंप 6.5 तीव्रतेचे होते.
Visuals of a Swimming Pool when the 7.4 earthquake hit Taiwan. #earthquake #Taiwan #Tsunami pic.twitter.com/YsBgfO9e2g
— Aajiz Gayoor (@AajizGayoor) April 3, 2024
25 वर्षांनंतर सर्वात शक्तिशाली भूकंप झाला
तैपेईच्या भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्याच्या वतीने मीडियाला सांगण्यात आले की, तैवानमध्ये आज सकाळी आलेला भूकंप हा गेल्या 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता. यापूर्वी 1999 मध्ये तैवानमध्ये आलेला भूकंप सर्वात धोकादायक होता. या भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी होती, ज्याने सुमारे 2500 लोकांचा बळी घेतला.
🚨#BREAKING: Multiple buildings have collapsed after a Pair of Massive 7.5 Earthquakes Strikes Triggering Tsunami Warnings
Currently, a pair of powerful, massive earthquakes has just occurred. The first one measured a magnitude of 7.5, followed by a 7.4… pic.twitter.com/XCKd7ocjel
— R A W S A L E R T S (@rawsalerts) April 3, 2024
जपानमध्ये 10 फूट उंच सुनामीचा इशारा
त्याचवेळी, तैवानचा शेजारी देश जपाननेही भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने त्सुनामीच्या लाटा 3 मीटर (10 फूट) उंचीपर्यंत येण्याचा इशारा दिला आहे. जोरदार भूकंपानंतर जपानला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्सुनामीचा इशारा जारी केल्यामुळे, लोकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले. त्यांना येथून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांचे प्राण सुनामीपासून वाचवता येतील. जपानचे मियाकोजिमा बेट तैवानजवळ आहे.
#WATCH | An earthquake with a magnitude of 7.2 hit Taipei, the capital of Taiwan.
Visuals from Beibin Street, Hualien City, Hualien County, eastern Taiwan.
(Source: Focus Taiwan) pic.twitter.com/G8CaqLIgXf
— ANI (@ANI) April 3, 2024
#WATCH | A very shallow earthquake with a preliminary magnitude of 7.5 struck in the ocean near Taiwan. Japan has issued an evacuation advisory for the coastal areas of the southern prefecture of Okinawa after the earthquake triggered a tsunami warning. Tsunami waves of up to 3… pic.twitter.com/2Q1gd0lBaD
— ANI (@ANI) April 3, 2024
🚨Terrifying scene on the Taipei Metro during the Taiwan earthquake. #earthquakepic.twitter.com/XUmhVPb7tU
— AJ Huber (@Huberton) April 3, 2024
BREAKING NEWS
See the building Under Construction are cOllapsing due to Horrible Earthquake of Magnitude 7.5 hit Taiwan Country.
See the condition 👇#Taiwan #earthquake #tsunami pic.twitter.com/xfDZ9iw2gh
— Ashish Singh (@AshishSinghKiJi) April 3, 2024
🚨Crazy video from Taiwan #earthquake pic.twitter.com/yHlOqU93Mm
— Nicholas Pagnotta (@npagnotta1776) April 3, 2024
Rooftop swimming pool during the Taiwan earthquake pic.twitter.com/3J1QKYULwT
— StrictlyChristo 🇺🇦🌻 (@StrictlyChristo) April 3, 2024
“Horrific videos capture the intensity of a 7.4 magnitude earthquake striking off Taiwan early Wednesday, causing widespread devastation and building collapses.#Taiwan #earthquake #taiwanearthquake #Taipei pic.twitter.com/tiNAqoV87V
— Nikhil saini (@iNikhilsaini) April 3, 2024