
Hair Straightening At Home: कुरळे आणि नागमोडी केसांपेक्षा सरळ केस विंचरणे सोपे आहे. पण अशा केसांची इच्छा पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे देऊनच पूर्ण होऊ शकते….सरळ केसांची इच्छा कमी खर्चामध्ये घरच्या घरी सहज पूर्ण होऊ शकते, चला जाणून घेऊया कशी?
कोरफड आणि मध
- कोरफडीच्या पानांपासून जेल काढा आणि त्यामध्ये मध मिसळा आणि मिक्सरमध्ये चांगले बारीक करा.
- ही पेस्ट केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत लावा. शॉवर कॅप आपले केस प्लास्टिकने झाकून ठेवा.
- ही पेस्ट किमान अर्धा तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर धुवा.
- केस सुकवल्यानंतर, तुम्हाला या पेस्टचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल.
- सरळ केसांसोबतच या पेस्टचा वापर केल्याने केसांचा कोरडेपणाही दूर होतो. केसांमध्येही चमक येते.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल
- एका भांड्यामध्ये दोन अंडी फोडून टाका. त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. हवं असल्यास थोडं दहीही मिक्स करू शकता. सर्वकाही एकत्र मिसळा.
- ही पेस्ट केसांना लावून एक ते दोन तास राहू द्या.
- त्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
- केसांमधील अंड्यांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही शॅम्पूचाही वापर करू शकता. तसे, एक चांगला पर्याय असा असेल की तुम्ही एका दिवसानंतर शैम्पू करा.
- या पेस्टचा वापर केल्यामुळे केस सरळ आणि चमकदारही होतात.
केळी आणि दही
- पिकलेले केळे चांगले मॅश करा.
- आता त्यात दही घालून चांगले मिसळा.
- ही पेस्ट टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा आणि अर्धा तास ठेवा.
- त्यानंतर साध्या पाण्याने शॅम्पू करा.