
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू दिवसें दिवस वाढतच आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध भाजपा असाही सामना रंगला आहे.
मात्र, कोकणामध्ये सध्या वगेळंच काही तरी घडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा – ‘राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते परंतु..’, उदय सामंत यांचं सूचक ट्वीट
अज्ञात व्यक्तींकडून मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. स्टंम्प आणि बाटल्या फेकून ते पसार झाले. भास्कर जाधव यांच्या घर आणि वाहनांवर दगडफेकण्यात आले आहे. ही दगडफेककुणी कोणी केली हे माहीत नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.