
सावंतवाडी – आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावार दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांचे संरक्षण असताना देखील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होताना दिसत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे.