Steve Smith चा धमाका! कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केला ‘हा’ विक्रम

WhatsApp Group

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे.

स्टीव्ह स्मिथच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा पार पडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. स्मिथने हा पराक्रम केवळ 174 व्या डावात केला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारे फलंदाज

कुमार संगकारा – 172
स्टीव्ह स्मिथ – 174
राहुल द्रविड – 176
ब्रायन लारा – 177
रिकी पाँटिंग – 177

स्टीव्ह स्मिथ त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 99 वा सामना खेळत आहे. आतापर्यंत त्याने 59.65 च्या सरासरीने 9007 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 31 शतके, 4 द्विशतके आणि 37 अर्धशतके झळकली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 239 आहे.

पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी तयार केली. यानंतर कर्णधार बेन स्टोक्सनेही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, असे असतानाही ऑस्ट्रेलियन फलंदाज शानदार फलंदाजी करत आहेत. 73 धावांवर पहिली विकेट पडली. उस्मान ख्वाजा 17 धावा करून बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वृत्त लिहिपर्यंत स्टीव्ह स्मिथ 38 आणि मार्नस लबुशेन 45 धावांवर खेळत आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 विकेटवर 190 धावा आहे.