भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; महिलेला अटक

WhatsApp Group

मुंबई : मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तर तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांना ताब्यात घेतलं आहे, जे रेल्वे स्टेशनवरून मुलं चोरून त्यांना भीक मागायला ती लावत असे. 8 सप्टेंबर रोजी एका महिलेने मुंबईतील बोरिवली जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तिचं तीन वर्षांचं बाळ बोरिवली स्टेशनमधून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दादर स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी महिला हरवलेल्या मुलासोबत दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला हरवलेल्या मुलासह दादर स्थानकातून ताब्यात घेतले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामध्ये बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर अल्पवयीन मुलगी या बेपत्ता मुलाला घेऊन धावताना होती. हे दृश्य बालक चोरीचं आहे, ज्यात मुलगी बाळाला चोरून पळून जाताना दिसत होती.