बसवर हल्ला, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

WhatsApp Group

महाराष्ट्र: महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (२२ फेब्रुवारी) एमएसआरटीसी बसवर हल्ला झाल्यानंतर कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेस बंद करण्याचे आदेश दिले.

प्रताप सरनाईकम्हणाले की, बेंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसवर शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. तथापि, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे निर्देश एस. टी. महामंडळास दिले आहे. कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत, असं प्रताप सरनाईक म्हणालेत.