बारावी परीक्षा: पहिल्याच पेपरला 42 केंद्रांवर कॉपी, मुंबई, कोल्हापूर आणि कोकणाचं कौतुक एकही प्रकरण नाही

WhatsApp Group

राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपीची प्रकरणं समोर आली आहेत.  तब्बल 42 परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना उघड झाल्या असून, भरारी पथकांनी तत्काळ दखल घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

यंदा राज्य सरकारने बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. कॉपी रोखण्यासाठी विविध यंत्रणांची नेमणूक करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शिक्षण राज्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवत असून, त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर अचानक भेट देऊन पाहणी केली.

शासनाच्या कडक उपाययोजनांनंतरही कॉपी प्रकरणे आढळून येत असल्याने परीक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील पेपरसाठी प्रशासन आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्य सरकारने यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी कडक उपाययोजना राबवल्या असतानाही, बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी प्रकरणांनी डोके वर काढले आहे. राज्यातील 42 परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकरणे उघड झाली असून, सर्वाधिक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्येच (26 केंद्रांवर) आढळून आले.

विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही कॉपी प्रकरण नोंदवले गेले नाही, त्यामुळे या विभागांनी 100% कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.