पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही VAT मध्ये कपात

WhatsApp Group

मुंबई – इंधनदरवाढीने (Petrol) होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त केले. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही इंधनावरील दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने आज २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्यामुळे पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.