विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी! Home Work बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

WhatsApp Group

पुणे : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कमी वेळात पटकन समजेल असं शिकवावं, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. परंतु हा मोठा निर्णय असून हे माझ व्यक्तिगत मत आहे. याबद्दल शिक्षक संघटना, संस्था चालक त्यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.