मुंबई – दिग्गज गायिका लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचे स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारने लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील कलिना येथे मुंबई विद्यापीठाच्या जागेवर बांधणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या उभारणीवर चर्चा करण्यात आली. अखेर सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये लतादीदींचे स्मारक बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या जागेत एक कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार असून यावर तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत