Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय असतील नियम
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. निर्बंध कमी झाल्यामुळे नागरिक आता मोठ्या उत्साहामध्ये होळी (Holi), धुळवड (Dhulivandan / Dhulvad) साजरी करण्याचा बेत आखत आहेत. तुम्हीही तसाच बेत आखत असाल तर मग थांबा.
कारण, होळी आणि धुळवड साजरी करण्याबाबत आता राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
अशी आहे राज्य सरकारची नियमावली
- रात्री 10 वाजण्याच्या आत होळी करावी
- 10 वाजण्याच्या आधी होळी लावणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर परवानगी नसणार
- होळी साजरी करताना डीजे लावण्यावर बंदी असणार आहे.
- होळी साजरी करताना डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई केली जाणार.
- दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे लाऊड स्पीकर जोरजोरात न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत.
- कुठल्याही जाती किंवा धर्माच भावना दुखावल्या जातील अशा कोणत्याही घोषणा देऊ नये.