राज्यावर वीज संकट; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली कबुली

WhatsApp Group

नागपूर – वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (MSEDCL employees strike) राज्यांमध्ये वीज संकट उद्भवल्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (State Energy Minister Nitin Raut) यांनी मान्य केले आहे. राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रापैकी पाच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये फक्त दोन दिवस पुरेल एवढाचं कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधीच नियोजन न केल्यामुळे हे संकट उद्भवले का याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः मान्य केले की केंद्र व राज्य सरकारच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी आता खंडीत झाली. त्यामुळे राज्यावर विजेचे संकट उद्भवले आहे.

मात्र याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी माझी त्यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. एक पाऊल त्यांनी मागे जावं एक पाऊल मी पुढे येतो’ अशी देखील विनंती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.