सकाळी ‘या’ सवयींनी दिवसाची सुरुवात करा: राहाल तंदुरुस्त आणि निरोगी

WhatsApp Group

दिवसाची सुरुवात आरोग्यदायी गोष्टींनी करावी. जेणेकरून तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. विशेषत: या कोरोनाच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सकाळी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजार दूर होतात. आपण दिवसाची सुरुवात काही आरोग्यदायी गोष्टींनी करायला हवी. चला जाणून घेऊया या आरोग्यदायी आहाराबद्दल

  • रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध आणि लिंबू टाकून प्या. हे तुमचे शरीर डिटॉक्स करते. तसेच तुम्हाला खूप निरोगी वाटते.
  • चिया बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही 1 ग्लास चिया सीड्स पाण्याने दिवसाची सुरुवात केली तर तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. यासोबतच वजनही नियंत्रणात राहील.
  • आवळा सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच शरीराच्या इतर समस्याही नियंत्रणात राहतात.

 

  • भिजवलेल्या बदामांनी सकाळची सुरुवात करा. यामुळे तुमचे मनही फिट होते. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते.
  • रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खा. पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच वजन नियंत्रित ठेवता येते.
  • जर तुम्हाला दिवसाची सुरुवात हायड्रेटिंग पदार्थांनी करायची असेल तर सकाळी लवकर टरबूज खा. यामुळे तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे वाटेल. तसेच ते तुमचे शरीर हायड्रेट ठेवू शकते.