Cristiano Ronaldo: स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो थोडक्यात बचावला, कोट्यवधी रुपयांच्या गाडीचा झाला चुरा

WhatsApp Group

मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉल क्रिस्टियानो रोनाल्डोला गाड्यांची खूप आवड आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असल्यामुळे रोनाल्डोकडे अनेक आलिशान कार आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो सतत काहीना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो बलात्काराच्या एका खटल्यामुळे चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोची अमेरिकेतील न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आता रोनाल्डो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर असलेल्या क्रिस्टियानोच्या बुगाटी व्हेरॉन कारचा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी स्पेनमधील मेयोर्का शहरातील एका घराच्या फाटकाजवळ या गाडीला अपघात झाला.

रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटत असून त्याने समुद्रमार्गे ही गाडी स्पेनला मागवली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी रोनाल्डो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही या गाडीमध्ये नव्हते. रोनाल्डोचा एक कर्मचारी ही गाडी चालवत होता. एका वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडीचा अपघात झाला. अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रोनाल्डोचा कर्मचारी मात्र, सुरक्षित आहे.