IPL 2022: चेन्नईला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा आयपीएल 2022 हंगामातून बाहेर

WhatsApp Group

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) IPL सीझन 15 मधून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने याबाबत अधिकृत घोषणा देखील केली आहे. आयपीएलचा 49वा सामना 4मे रोजी आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान जडेजा एक झेल घेताना जखमी झाला होता.

चेन्नई सुपर किंग्सने याबाबत अधिकृत घोषणा केली आणि जडेजा बाहेर पडण्याची पुष्टीही केली. जडेजा सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.

आयपीएलची स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून गुरुवारी सीएसकेचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. अशा परिस्थितीत जडेजा संघातून बाहेर पडणे हा चेन्नईसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आयपीएल 2022 मध्ये जडेजाला चेन्नईचे कर्णधारपद देण्यात आले होते, पण त्याची कामगिरी आणि संघाची कामगिरी खराब होती. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. कर्णधारपद सोडल्यानंतर तो दोन सामन्यांत खेळला, पण दुसऱ्या सामन्यात झेल घेताना तो जखमी झाला आणि आता तो आयपीएल 2022 सीझनमधून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.