राज्यात जुनी पेन्शन हक्क योजना मिळावी यासाठी संप पुकारण्यात आला होता. यमद्धे शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच बहिष्कारामुळे देखील आधीच उत्तरपत्रिका तपासणीला विलंब झाला होता. मात्र संप मागे घेतल्यामुळे आता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
बुधवारी सुटी असतांना देखील उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू ठेवण्यात आले होते. शिक्षकांनी देखील तपासणीचे काम वेगात होईल आणि दहावी-बारावीचा निकाल वेळेतच लागेल असे म्हटले आहे.