SSC-HSC Board Exam 2023: दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येणार नाही

WhatsApp Group

येत्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान परिक्षा पारपडणार आहे. मात्र याचदरम्यान परिक्षेबाबत मंडळाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला मुलांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहावं लागणार आहे.

IND v AUS: तिसर्‍या कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले, ‘येथे’ खेळला जाईल सामना

जर परीक्षेला पोहोचायला उशिर झाला तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येणार नाही, अशी सूचना परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे. परीक्षा मंडळाच्या मते, उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा मुलं चुकीचा फायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निरर्शनास आले आहे. त्यामुळे बोर्डाकडून अशी सूचना जारी करण्यात आली.