Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार होती श्रीदेवी, हिरोपेक्षा घ्यायची जास्त फीस

Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडची (Bollywood) हवा हवाई गर्ल श्रीदेवीची आज जयंती Birth Anniversary आहे. तिचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून चित्रपटांमध्ये (Movie) काम करायला सुरुवात केली होती. 50 वर्षे इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या श्रीदेवीने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. एकेकाळी ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असायची. तिच्या एका चित्रपटाची फी एक कोटी रुपये असायची.
त्या काळात सहसा फक्त हिरोलाच करोडो रुपये फी मिळायची, पण श्रीदेवी याला अपवाद ठरली जी एक कोटी रुपये फी घेणारी इंडस्ट्रीतील पहिली अभिनेत्री ठरली. श्रीदेवीने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोलवाँ सावन’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण 1983 मध्ये हिम्मतवाला या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने जोरदार पुनरागमन केले आणि त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.
श्रीदेवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपट केले. यामध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवीचे स्टारडम इतके होते की एकेकाळी तिच्या यशाने सुपरस्टार सलमान खानही दंग झाला होता.
एका मुलाखतीत सलमानने स्वत: याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, तो श्रीदेवीसोबत काम करताना नर्व्हस होतो आणि त्याला वाटत होते की, जर त्याने श्रीदेवीसोबत काम केले तर त्याच्या कामाची कोणीही दखल घेणार नाही, सर्वांच्या नजरा फक्त श्रीदेवीवरच राहतील.