वेस्ट इंडिजनंतर आता श्रीलंका टीम इंडियाचं टार्गेट, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

WhatsApp Group

लखनऊ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केले. आता भारतीय संघाच्या नजरा श्रीलंकेविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर आहेत. भारत आणि श्रीलंका India vs Sri Lanka  यांच्यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. भारत २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ लखनौला पोहोचला आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत. दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. केएल राहुल दुखापतग्रस्त असून पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला टी-२० आणि कसोटी दोन्ही संघांचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा संघ दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर ४ मार्च ते १२ मार्च दरम्यान २ कसोटी सामने खेळवले जातील.

भारत आणि श्रीलंकेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

  • २४ फेब्रुवारी, पहिला टी-२० सामना, लखनऊ
  • २६ फेब्रुवारी, दुसरा टी-२० सामना, धर्मशाळा
  • २७ फेब्रुवारी, तिसरा टी -२० सामना, धर्मशाळा
  • ४-८ मार्च, पहिला कसोटी सामना, मोहाली
  • १२-१६ मार्च, दुसरी कसोटी, बंगळुरू

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.