Asia Cup Final LIVE: भानुका राजपक्षेचे शानदार अर्धशतक, श्रीलंकेने पाकिस्तानसमोर ठेवले 171 धावांचे लक्ष्य

Asia Cup Final LIVE: आशिया कप 2022 फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना, भानुका राजपक्षेच्या दमदार अर्धशतकामुळे श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले.
Wow what a recovery! Sri Lanka were 58/5, but Rajapaksa’s superb 71* (45) and a brisk 36 (21) from Hasaranga takes to 170!#SLvPAK #AsiaCupFinal
— Cricbuzz (@cricbuzz) September 11, 2022