SRH Vs RCB: सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 25 धावांनी पराभव केला
RCB vs SRH: IPL 2024 चा 30 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय उच्च स्कोअरिंगचा होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या केली आणि आरसीबीविरुद्ध शानदार विजय मिळवला.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 287 धावा केल्या. जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. सनरायझर्स हैदराबादने स्वतःचाच विक्रम मोडला. यापूर्वी याच मोसमात हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा केल्या होत्या. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही 200 हून अधिक धावा केल्या, मात्र संघ विजयापर्यंत पोहोचू शकला नाही. 25 धावांनी हैदराबादने हा सामना जिंकला.
For the first time ever, both sides cross 250 in an IPL game, but it’s the Sunrisers who prevail in this Chinnaswamy run-fest 👏
🔗: https://t.co/VXLGJFVL3t | #IPL2024 | #RCBvsSRH pic.twitter.com/r5akMnIc6K
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 15, 2024
हैदराबादने 8 वर्षांची प्रतीक्षा संपवली
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 वर्षांनंतर पराभव केला. यापूर्वी 2016 साली एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादने हा ऐतिहासिक सामना जिंकून विजयाची 8 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली.
A valiant 83 (35) from #DineshKarthik who walks off to a rousing standing ovation from the home crowd 🙌
💥 549 runs scored in this game is the highest aggregate in a T20 match EVER
💥 #RCB‘s 262/7 is also the highest total in a T20 run-chase EVER#RCBvsSRH #RCBvSRH… pic.twitter.com/t9JvX2Maoh
— Cricbuzz (@cricbuzz) April 15, 2024
हैदराबादच्या फलंदाजांची तुफानी खेळी
या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. यानंतर हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या. एडन मार्कराम 17 चेंडूत 32 धावा करून नाबाद राहिला आणि अब्दुल समद 10 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे अभिषेक शर्मानेही 34 धावांचे योगदान दिले.
दिनेश कार्तिकची दमदार खेळी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून या सामन्यात दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. दिनेश कार्तिकने 35 चेंडूत 83 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. याशिवाय फाफ डू प्लेसिसने 62 धावांची खेळी केली. विराट कोहलीनेही 42 धावांचे योगदान दिले. मात्र या खेळी संघाला विजयापर्यंत नेऊ शकल्या नाहीत.