SRH Vs MI: रोमहर्षक सामन्यात हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी केला पराभव
IPL 2024 SRH vs MI: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आहे. 277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ 246 धावा करू शकला. मुंबईकडून फलंदाजी करताना टिलक वर्माने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. याशिवाय टिन डेव्हिडने 42 धावांची खेळी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळे हैदराबादचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ही त्यांच्यासाठी या सामन्यात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या बोर्डावर ठेवली, ज्याचा पाठलाग मुंबई करू शकली नाही. मुंबईच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असले तरी विजय मिळवता आला नाही.
𝙁𝙄𝙍𝙀 ante idi, 𝙗𝙧𝙤 🤩
A match and night that Uppal will 𝗻𝗲𝘃𝗲𝗿 forget 🔥#PlayWithFire #SRHvMI pic.twitter.com/ItMuLo9diK
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 27, 2024
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या असलेल्या 278 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाला चांगली सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 56 (20 चेंडू) धावांची भागीदारी केली. पण त्याचा पहिला धक्का चौथ्या षटकात इशानच्या रूपाने बसला, जो 13 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 34 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मुंबईने रोहित शर्माच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. जो पाचव्या षटकात 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 26 धावा (12 चेंडू) करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची (37 चेंडू) भागीदारी केल्याने चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या. पण ही भागीदारी 11 व्या षटकात 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 30 धावा (14 चेंडू) करून बाद झालेल्या नमन धीरच्या विकेटने संपुष्टात आली.
यानंतर 15 व्या षटकात टिळक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याने 34 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावत 64 धावा केल्या. यानंतर 18व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. कर्णधार पंड्याने 20 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 24 धावा केल्या. बाद होण्यापूर्वी हार्दिकने टीम डेव्हिडसोबत पाचव्या विकेटसाठी 42 (23 चेंडू) धावांची भागीदारी केली होती. टीम डेव्हिडने शेवटपर्यंत उभे राहून 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 42* धावा केल्या.
हैदराबादने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या केली
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 277/3 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. हेनरिक क्लासेनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, ज्याने 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 80* धावा केल्या. याशिवाय अभिषेक शर्माने 23 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या होत्या. सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने 24 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.