Breaking : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये झाला आगीचा भडका, 185 प्रवाशांचा जीव टांगणीला

WhatsApp Group

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानाने पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानामध्ये 185 प्रवासी होते. विमानाने उड्डाण घेताच ते पेटल्यामुळे पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला होता. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली.

या आगीची माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पायलटने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ ठळला आहे.