कोकणातील लोकांसाठी खास असलेल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी 4 फेब्रुवारी दिवशी मालवणात आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी मध्य रेल्वेकडून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जातील. 3 फेब्रुवारी पासून या विशेष ट्रेन्स सुरू होणार असून पुढे होळी पर्यंत या ट्रेन्स चालू ठेवल्या जाणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) चालवल्या जाणार्या या विशेष ट्रेन्सचे बुकिंग आजपासून (31 जानेवारी ) खुले करण्यात आले आहे. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी 18 विशेष ट्रेन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Running of Additional Winter / Aanganewadi / Holi Special Trains @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @SWRRLY @GMSRailway pic.twitter.com/L45gQd0iKX
— Konkan Railway (@KonkanRailway) January 27, 2023
