पंतप्रधान मोदींची महिला दिनानिमित्त विशेष भेट! गॅस सिलेंडर केले स्वस्त
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
LPG Cylinder Price Reduced: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. महिलांना मोठी भेट देत केंद्रातील मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीत आता 100 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल उचलण्यामागे सरकारचा उद्देश महिला शक्तीचे जीवन सुसह्य करणे आणि करोडो कुटुंबांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती देताना पंतप्रधानांनी लिहिले की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”
Today, on Women’s Day, our Government has decided to reduce LPG cylinder prices by Rs. 100. This will significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our Nari Shakti.
By making cooking gas more affordable, we also aim…
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
हेही वाचा – ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, बहिणीच्या मृत्यूनंतर 48 तासांनी घेतला अखेरचा श्वास
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले होते. 31 मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी अनुदानात ही वाढ करण्यात आली आहे. 100 रुपयांच्या कपातीच्या एक दिवस आधी, सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान योजना आणखी एका वर्षासाठी वाढवली होती.
लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरसाठी एलपीजी सबसिडी मिळत होती, जी पुढील वर्षीही सुरू राहणार आहे. या अंतर्गत एकूण खर्च सुमारे 12,000 कोटी रुपये असेल. याअंतर्गत अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. उल्लेखनीय आहे की पुढील आर्थिक वर्षाच्या अंतरिम बजेटमध्ये एलपीजी सबसिडीसाठी 11,925 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
PM @narendramodi confirms 300/- subsidy in #LPG for the PM #UjjwalaYojna
— Gautam Agarwal 🇮🇳 (@gauagg) March 7, 2024