छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना खासदार अमोल कोल्हेंचा माईकच केला बंद!

WhatsApp Group

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधानाचा मुद्दा मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा आज माईक बंद करण्यात आला. त्यानंतर अमोल कोल्हे चांगलेच संतापले.

या घटनेनंतर सभागृहाच्या बाहेर येताच अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले आहेत.