
रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि डेव्हिड मिलरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या T20 India vs South Africa सामन्यात भारताचा 5 चेंडू राखून आणि 7 गडी राखून विजय मिळवला South Africa won by 7 wkts. 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकांत 3 बाद 212 धावा करून भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्याची मोठी संधी होती. पण पहिल्याच सामन्यातील कर्णधारपदाचे दडपण ऋषभ पंतच्या निर्णयांवर स्पष्टपणे दिसून आले. IPL 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकणाऱ्या युझवेंद्र चहलला पंतने फक्त 2 षटके दिली आणि नंतर त्याला शेवटचे षटक टाकण्यास सांगितले, जिथे सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातात पोहोचला होता.
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी फिनिशरची भूमिका बजावणारा डेव्हिड मिलर भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातही त्याच्या जुन्या शैलीत दिसला. डी कॉक बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या डेव्हिड मिलरने पहिल्या 10 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. पण त्यानंतर त्याने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पुढच्या 13 चेंडूत 40 धावा केल्या. त्याचवेळी त्याचा जोडीदार डुसेनही जवळपास धोकादायक फलंदाजी करताना दिसला. त्याने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 64 चेंडूत 131 धावांची नाबाद भागीदारी झाली. मिलरने 31 चेंडूत 64 तर डुसेनने 46 चेंडूत 75 धावा केल्या.
What a match!
South Africa record their highest successful run chase in men’s T20Is ????#INDvSA | https://t.co/EAEI2MRCT2 pic.twitter.com/aMkNnde0Yu
— ICC (@ICC) June 9, 2022
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज आफ्रिकन फलंदाजांसमोर गुडघे टेकताना दिसले. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारही चांगलाच महागात पडला आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्टने त्याच्या शेवटच्या षटकात 22 धावा दिल्या. किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हर्षल पटेलने 4 षटकात 43 धावा दिल्या. मिलर आणि ड्युसेनची जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले, हेच भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. अक्षर पटेलने 4 षटकात 40 धावा दिल्या. चहलने 2.1 षटकात 26 धावा दिल्या.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 211 धावा केल्या होत्या. भारतासाठी इशान किशनने सर्वाधिर 48 चेंडूंत 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये मध्ये भारतीय फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वात मोठी खेळी ठरली आहेत.