IND vs SA: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, टेम्बा बावुमाकडे कर्णधारपद

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेने 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी तसेच भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 28 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेने संघाचे कर्णधारपद टेम्बा बावुमाकडे सोपवले आहे. अनुभवी खेळाडू क्विंटन डी कॉकला संघात स्थान मिळाले आहे. एडिन मार्कराम आणि केशव महाराज हे देखील संघात आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 2 ऑक्टोबरला तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.  एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यानंतर 2022 मध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे, जो 23 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जनमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, ड्वेनस, डेव्हिड मिलर. रबाडा, तबरेझ शम्सी. राखीव खेळाडू – ब्योर्न फोर्टुइन, मार्को जेन्सेन आणि अँडिले फेहलुकवायो