SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, रुसोचं दमदार शतक

WhatsApp Group

T20 विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यात आज दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर 206 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच षटकात टेम्बा बावुमाच्या रूपाने मोठा धक्का बसला. पण यानंतर रिले रुसो आणि क्विंडन डी कॉक यांनी 85 चेंडूत 163 धावांची भागीदारी रचली. यादरम्यान रुसोने आपले शतक पूर्ण केले, तर डी कॉकने अर्धशतक केले. रुसो 56 चेंडूत 109 धावा करून बाद झाला तर डी कॉकने 38 चेंडूत 63 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

रोसो T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला या फॉरमॅटच्या 7 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावता आले नाही. रिले रोसोच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावांपर्यंत मजल मारली आहे. आता जर पावसाने खेळ खराब केला नाही तर ती 2022 च्या टी-20 विश्वचषकातील आफ्रिका पहिला विजय नोंदवू शकते. रिले रोसोशिवाय क्विंटन डी कॉकने 38 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी खेळली.