T20 WC 2022: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव, मिलर आणि मार्कराम ठरले विजयाचे हिरो
T20 WC 2022: पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेटने पराभव केला आहे. या रोमांचक सामन्यात डेव्हिड मिलरने चांगली कामगिरी केली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. एडिन मार्करामनेही संघासाठी अर्धशतक झळकावले. भारताकडून सूर्यकुमार यादवने 68 धावांची खेळी केली. तर अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. रविचंद्रन अश्विन भारतासाठी चांगलाच महागात पडला. त्याने 43 धावा दिल्या.
टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा सलामीला आले. यादरम्यान डी कॉक 1 धावा करून बाद झाला. तर बावुमा 15 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रिले रोझला खातेही उघडता आले नाही. त्याला अर्शदीप सिंगने आपला बळी बनवले. एडिन मार्करामने अर्धशतक ठोकले. त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या. मार्करामच्या खेळीत 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
A thrilling win for South Africa and it takes them to the top of the table in Group 2 💪#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/uficuiMq0H pic.twitter.com/0TLFpUmAd7
— ICC (@ICC) October 30, 2022
डेव्हिड मिलरने उत्तम कामगिरी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. मिलरने या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. पारनेल 2 धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने 19.4 षटकांत 5 विकेट्स गमावून सामना जिंकला.
भारताकडून अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. त्याने 4 षटकात 25 धावा दिल्या. मोहम्मद शमीने 4 षटकात केवळ 13 धावा देत एक विकेट घेतली. हार्दिक पांड्याने 4 षटकात 29 धावा देत एक विकेट घेतली. रविचंद्रन अश्विन चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 43 धावा देत एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3.4 षटकात 21 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने संघासाठी चांगली फलंदाजी केली. त्याने 40 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकारही मारले. कर्णधार रोहित शर्मा 15 धावा करून बाद झाला. त्याने 14 चेंडूंचा सामना करताना एक चौकार आणि एक षटकार ठोकला. विराट कोहली 11 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा स्पर्श करता आला नाही. केएल राहुल 9 धावा करून बाद झाला आणि हार्दिक पांड्याने 2 धावा केल्या.