
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर वर्मा यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, त्यांनी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण टॉलिवूडला धक्का बसला आहे. सुधीरने आत्महत्या का केली याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही, मात्र काही दिवसांपासून तो मानसिक त्रासाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. 2016 मध्ये आलेल्या ‘कुंदनापू बोम्मा’ या चित्रपटातून त्याने आपली छाप पाडली.
सुधीर वर्मा यांच्यासोबत काम केलेल्या सुधाकरने त्यांच्या सहकलाकाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “सुधीर एक चांगला माणूस होता. अजूनही विश्वास बसत नाही की तो या जगात नाही! ओम शांती.”
हेही वाचा – आदिलने सर्वांसमोर प्ले केला ‘तो’ व्हिडिओ, राखीला फुटला घाम
Sudheer! @sudheervarmak Such a lovely and warm guy’ It was great knowing you and working with you brother! Can’t digest the fact that you are no more! Om Shanti!🙏🙏🙏 @iChandiniC @vara_mullapudi @anil_anilbhanu pic.twitter.com/Sw7KdTRkpG
— Sudhakar Komakula (@UrsSudhakarK) January 23, 2023
सुधीर वर्मा हे चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी अभिनय विश्वातही नशीब आजमावले आहे. 2013 मध्ये त्यांनी ‘स्वामी रा रा’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी केशव आणि रणरंगम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. सुधीर यांच्या निधनानंतर सर्व चाहते त्यांना श्रद्धांजली वाहतात.
हेही वाचा – Sakshi Malikचे नवीन फोटो झाले व्हायरल
2022 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला
तेलगू चित्रपटसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी दक्षिण भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही या जगाचा निरोप घेतला, ज्यात विद्रोही स्टार कृष्णम राजू, एम बलाया, दिग्दर्शक सरथ आणि तेलुगू स्टार कृष्णा यांचा समावेश आहे. याशिवाय अभिनेता चालपती राव यांचेही 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.