T20 World Cup: जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर नाही, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलं मोठं अपडेट

WhatsApp Group

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे की, विश्वचषक सुरू होण्यास अजून वेळ आहे, त्यामुळे बुमराहकडून खेळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

सौरव गांगुलीने एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितले की, जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर नाही. विश्वचषक सुरू व्हायला अजून वेळ आहे. आपण थांबले पाहिजे आणि घाईत काहीही बोलू नये.

पाठदुखीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते. वास्तविक, जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या समस्येमुळे आशिया चषकाचा भागही होऊ शकला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड करण्यात आली. मात्र पाठदुखीच्या समस्येमुळे तो या मालिकेतूनही बाहेर पडला. बुमराहच्या T20 विश्वचषकात खेळण्याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला तरी बुमराह पाकिस्तानविरुद्ध खेळू शकेल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. बुमराह न खेळल्यास मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांचा टीम इंडियात समावेश केला जाऊ शकतो.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा