Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्रास वाढल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.