Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर आता सोनिया गांधींना कोरोनाची लागण

WhatsApp Group

Sonia Gandhi Corona Positive : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये राहणार आहे. सोनिया गांधी यांना नुकताच कोविड झाला होता. 10 ऑगस्ट रोजी प्रियंका गांधी यांनी देखील आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

सोनिया गांधी यांनाही जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. त्यांना 12 जून रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे, त्या कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. त्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो. असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook