नवज्योतसिंग सिद्धूची खुर्ची जाणार, सोनिया गांधींनी मागितला पाच राज्यांच्या अध्यक्षांचा राजीनामा

WhatsApp Group

नवी दिल्ली – यूपीसह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस नव्याने पक्ष मजबूत करण्यासाठी एकवटली आहे. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी एका ट्विटमध्ये पुष्टी केली की सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तराखंड, यूपी, गोवा आणि मणिपूरमधील सर्व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे जेणेकरून नवीन पीसीसी प्रमुखाची पुनर्रचना करता येईल Sonia Gandhi resignations has asked the PCC Presidents .

मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून माहिती दिली की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची राज्य युनिट्समध्ये पुनर्रचनेकडे वाटचाल सुरू आहे. अशा स्थितीत पक्षाच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या सर्व प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


सोनिया गांधींच्या सूचनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, आता नवज्योतसिंग सिद्धूसह Navjot Singh Sidhu पाचही राज्यांच्या पीसीसी प्रमुखांना लवकरच हटवले जाऊ शकते. यापूर्वी पंजाब काँग्रेस पक्षानेही आढावा बैठक घेतली होती. ज्यात काँग्रेस नेत्यांनी पराभवाचे खापर नवज्योतसिंग सिद्धू, चरणजीत सिंह चन्नी आणि सुनील जाखड यांच्यावर फोडले. काँग्रेसचे बलाढ्य नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांनी तर म्हटले की, ‘सिद्धू की ठोको ताली ने कांग्रेस को ही ठोक दिया.’