
Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासोबत सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या होत्या त्यातील काही नेते देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितलं. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोनियांनी स्वत:ला सध्या आयसोलेट करुन घेतले असून आपल्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केल्याचं सुरजेवालांनी सांगितलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या असून ८ जूनपर्यंत त्या बऱ्या होतील असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे.