Sonarika Bhadoria Wedding: ‘देवो के देव महादेव’ फेम सोनारिका भदौरिया अडकली लग्नबंधनात

WhatsApp Group

Sonarika Bhadoria : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी आणि सुरभी चंदना-करण शर्मा यांच्यासोबत ‘देवो के देव महादेव’ मालिकेत पार्वती या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री सोनारिका भदौरिया विवाहबंधनात अडकली आहे. सोनारिका हिने साकारलेल्या पार्वती या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता ‘देवो के देव महादेव’ फेम सोनारिकाने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

सोनारिकाने बॉयफ्रेंड विकास पाराशरसोबत लग्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सोनारिका आणि विकास एकमेकांना डेट करत होते. जवळपास दीड वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, विकास रियल इस्टेटमधील प्रसिद्ध ब्रोकर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

2022 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत खुद्द सोनारिका हिने विकास याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली होती. विकास याने सोनारिका हिला मा लदीव येथे प्रपोज केला होता. त्यानंतर दोघांचा रोका संपन्न झाला होता.

लग्नाच्या 3 वर्षानंतर वरुण धवन होणार बाबा, नताशाचा बेबी बंप फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिका हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘देवों के देव महादेव’ मालिके शिवाय अनेक तामिळ आणि तेलूगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘इश्क में मरजावां’, ‘तुम देना साथ मेरा’, ‘दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील सोनारिका हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि केमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सोनारिका तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)