Sonali Phogat Passed Away: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sonali Phogat Passed Away : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. सोनाली यांच्याविरोधात 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबादमध्ये झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झालं होतं. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईमध्ये होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी वसतिगृहात राहते.
शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram